Search This Blog

Search Engine

Custom Search

20160530

Online Portal by Maharashtra Police for Vehicle Theft

Source - Whats App message
Please forward for awareness.

आपले वाहन चोरीला गेलेस आता प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नाही:-

महाराष्ट्र पोलीस विभागाने "Vahanchoritakrar" "वाहन चोरी तक्रार" नावाचे एक नविन पोर्टल नुकतेच सुरु केल आहे.
या द्वारे आपण आता आपल्या वाहन चोरीची तक्रार घर बसल्या, सायबर कैफे मधुन किंवा आपल्या मोबाईल वरुन, कोठुनही "वीना शुल्क" नोंदवु शकता. तसेच तपासाबाबत स्थिती जाणून घेवु शकता.
याकरीता नागरीकांना महाराष्ट्र पोलीस विभागाने "ऑनलाईन" सुरु केलेल्या "पोर्टल" वर जावुन प्रथम नोंदणी करावी लागेल.
नोंदणी करीता आवश्यक बाबी:-

1. संगणक, अँड्रॉइड मोबाईल फोन
2. इंटरनेट कनेक्शन

या नोंदणी मध्ये खालील माहिती "अचुक" भरावी लागेल.
1.www.vahanchoritakrar.com या वेबसाईट वर जा.
2. तेथे स्वतःचा मोबाईल नंबर
3. ई-मेंल आय डी
4. आधार कार्ड नंबर
5. स्वतःचे नाव
6. स्वतः चा पासवर्ड ठरवुन (Desired Password) भरावा लागेल.
7. विनंती रजिस्टर करावी लागेल.

नंतर ओळख पट्विण्यासाठी (OTP) पासवर्ड आपण नोंदवलेल्या ई-मेंल वर येईल. तो पासवर्ड बॉक्स मध्ये भरून सबमीट करुन नोंदणी करावी लागेल.
तुमची नोंदणी (Registration) झाल्यानंतर तुम्ही तुमचा नोंदवलेला मोबाईल नंबर, ठरवलेला पासवर्ड आणि वेरीफिकेसन कोड (Captcha) टाकून लॉगीन करू शकता.
लॉगीन केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमचे जे वाहन हरवले किंवा चोरीला गेले या बाबत तक्रार नोंदवु शकता.
या मध्ये

1. वाहनाचा प्रकार
2. वाहन बनवलेली कंपनी
3. वाहनाचा RTO नोंदणी क्रमांक
4. चेसीस नंबर
5. इंजिन नंबर
6. मॅनुफ़ैक्चर वर्ष
7. व्हेईकल मोडेल
8. वाहनाचा रंग
9. वाहन ज्याच्या नावावर आहे त्याचे नाव
10. वाहन जेथुन चोरीला गेले आहे ते ठिकाण
11. गाव, तालुका, जिल्हा
12. चोरी गेल्याचा कालावधी

नमुद करावा लागेल.
आपली तक्रार पोर्टलला एकदा नोंद झाल्यानंतर, ती तक्रार वाहन ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधुन चोरीला गेले आहे त्या पोलीस ठाण्याकड़े वर्ग होईल. नंतर पोलीस आपणाशी संपर्क करतील.
तुम्ही आवश्यकतेनुसार तुमचा प्रोफाइल (वैयक्तिक माहिती) केंव्हाही अप-डेट करू शकता.
तक्रार खोटी, चुकीची, कोणाला त्रास देण्याच्या हेतुने नोंदविल्यास खोटी तक्रार देणाऱ्यावर कारवाई होणार....

No comments: